महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 च्या अनुषंगाने निवडणूक कामी नेमणूक झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, त्यांनी अत्यंत दक्षतेने निष्पक्ष व पारदर्शी राहून काम करावे अशा कठोर शब्दांत सूचना निवडणूक अधिकारी तथा पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय अधिकारी, भरारी पथक प्रमुख, स्थायी निगरानी पथक प्रमुख व व्हिडिओग्राफी निगराणी पथक अशा सर्व पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आज महापालिका मुख्यालयात घेण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते.