भोकरदन: भोकरदन परिसरात मुसळधार पाऊस केंदरखेडा येथील पूर्णा नदीला आला पुर
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास भोकरदन परिसरात व पूर्णा नदी परिसरामध्ये हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पाऊस झाला आहे या पावसाने भोकरदन तालुक्यातून केदरखेडा परिसरातून वाहणारी पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचे पाहायला मिळाले असून हा पूर पाहण्यासाठी केदरखेडा गावातील व परिसरातील नागरिकांनी नदी परिसरामध्ये एकच गर्दी केल्याच्या सुद्धा पाहायला मिळाले.