वर्धा: जिल्ह्यातील नागरिकांनी विकसित महाराष्ट्र सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
Wardha, Wardha | Jul 14, 2025 भारत सरकारच्या 'विकसित भारत' या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र २०४७ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र २०४७ करिता व्हिजन डॉक्युमेन्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.