पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत भंगारपाडा परिसरात मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या आरोपीला अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. ५५ वर्षीय मंजुळा हरिचंद्र दबडे या पनवेलजवळील भंगारपाडा परिसरातून रस्त्याने पायी जात असताना ही घटना घडली. एका अनोळखी आरोपीने संधी साधून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जोराने खेचले आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.