जालना: लिंगसा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका व शिपाईला लाच घेतांना अटक;9 हजाराची मागीतली लाच;लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
Jalna, Jalna | Sep 17, 2025 जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परतुर तालुक्यातील लिंगसा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका आणि शिपाईला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असल्याची माहिती बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. तक्रारदाराने ग्रामपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या तीन गुंठे जागेची नोंद नमुना-8 वर घेण्यासाठी आणि उतारा मिळवण्यासाठी ग्रामसेविका श्रीमती आम्रपाली नामदेवराव घागरमाळी (कांबळे), रा. नाथ नगर, सेलू, जि. परभणी यांनी 9,000 रुपयांची लाच मागितली होती.