गोरेगाव: जैन रिसॉर्ट जवळ घरफोडी 25 हजार रुपयांची चोरी गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल, 24 आरोपी जेरबंद
दि.1 जून ते 2 जून च्या रात्री दरम्यान जैन रिसॉर्ट जवळील फिर्यादी राकेश हटवार वय 42 वर्षे हे बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने सुना मोका पाहून फिर्यादीच्या राहते घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेले लाकडी अलमारीचा कुलूप तोडून ड्रॉप मध्ये ठेवलेले नगदी पाचशे रुपयांच्या 30 नोटा एकूण 15 हजार व दोनशे रुपयाचा पन्नास नोटा एकूण 10 हजार असा एकून 25 हजार रुपयाचे रोख रक्कम अज्ञात चोराने चोरून नेल्याने गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.