मुर्तीजापूर: उमई जांबा रस्त्यावरील काटेपुर्णा नदीच्या पुलाजवळ एका ४२ वर्षिय इसमाची धारदार शस्त्राने हत्या तर दुसरा गंभीर जखमी
तालुक्यातील उमई-जांभा रस्त्यावरील काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून दुसरा गंभीर जखमी झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हा थरार घडला असून दिपक अवधूत वानखडेची हत्या झाली आहे, तर ६५ वर्षीय श्रीराम वानखडे गंभीर जखमी झाले आहेत.मृतकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून जखमी श्रीराम पांडोजी वानखडे यांच्यावर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.