राहुरी: वळण सोसायचीच्या चेअरमन पदी उमेश खिलारी बिनविरोध
राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वळण सोसायटीच्या चेअरमन पदी उमेश भाऊसाहेब खिलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज गुरुवारी सकाळी सोसायटीच्या सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी निवडनुकीचे कामकाज बघितले.चेअरमन पदासाठी जनसेवा मंडळाकडून उमेश खिलारी अन् बाळासाहेब खुळे यांचा उमेद्वारी अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यांनंतर बाळासाहेब खुळे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानंतर खिलारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.