शिरूर: करडे येथील कंपनीतून लाखोंचा माल चोरी.
Shirur, Pune | Sep 27, 2025 शिरूर तालुक्यातील करडे हद्दीतील एस. व्ही. एस. रेफकॉम प्रा. लि. कंपनीच्या युनिट क्रमांक 2 मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16 लाख 33 हजार रुपयांचा माल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.