पुसद: कासोळा फाटा येथे ट्रॅव्हल्स आणि कंटेनर चा अपघात ; ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कासोळा फाटा येथे दिनांक 8 नोव्हेंबर रोजी ट्रॅव्हल्स आणि कंटेनर वाहन मध्ये अपघात झाला आहे. कंटेनर चालकाने ट्रॅव्हल्स ला ठोस मारल्याने ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे तर आरोपी कंटेनर चालक स्वतःचा जखमी झाला आहे. सदर अपघात प्रकरणी ट्रॅव्हल्सचे कंडक्टरने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी कंटेनरच्या चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.