कन्नड: तहसील कार्यालयासमोर निष्क्रिय सरकारविरोधात शिवसेना उबाठा गटाचे जोरदार निदर्शने
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आज (ता.८) भव्य आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कन्नड तहसीलदारांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत, कर्जमाफी आणि पीकविमा भरपाईची मागणी करण्यात आली.मुख्य मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना ₹५०,००० हेक्टरी मदत, नुकसान झालेल्यांना कर्जमुक्ती, पीकविमा रक्कम त्वरित खात्यात जमा करणे आणि जनावरांच्या नुकसानीसाठी योग्य भरपाईचा समावेश होता.