वडवणी शहरातील नागरिकांचा आज सरकारी रेशनमधून मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यावरून संताप उसळला. शहरातील नागरिकांनी खराब, बुरशी लागलेले आणि खाण्यास अयोग्य धान्य थेट तहसील कार्यालयात आणत तहसीलदारांच्या टेबलावर ओतून आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी “आम्हाला दर्जेदार धान्य द्या!”, “एवढे वाईट धान्य आम्ही जनावरांनाही देणार नाही!” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून सरकारी रेशन दुकानांवरून मिळणारे धान्य अत्यंत निकृष्ट मिळते.