मौदा: वृंदावन लॉन मौदा येथे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
Mauda, Nagpur | Sep 15, 2025 वृंदावन लॉन मौदा येथे गायत्री परिवर्तन नागपूर व भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक दिनेश ढोबळे होते. प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष भारती सोमनाथे, वासुदेव चांदनखेडे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.