मुर्तीजापूर: माना पोलीस स्टेशनला बकऱ्या चोरीचा गुन्हा तपासात घेताच गुन्ह्यातील आरोपीला टाकरखेडा येथून मुद्देमालासह केली अटक
गुरुवार २ ऑक्टोंबर २०२५ रोजी अनिल रामदास साबळे राहणार टाकरखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बकऱ्यांच्या गोट्याचा तीन वाकून चितऱ्या बितऱ्या रंगाच्या आठ बकऱ्या व एक बोकड अंदाजे किंमत ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद प्राप्त होतास तपासात घेतला असता शनिवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान आरोपी अजीम शहा कलीम शहा राहणार टाकरखेडा तालुका भातकुली येथून मुद्देमालासह अटक केली असून अधिक तपास माना पोलीस करीत आहेत