रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपनगर येथे गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न रेणा सहकारी साखर कारखाना लि., दिलीपनगर येथे हंगाम 2025-26 चा 20 वा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे, लातूर ग्रामीण आमदार धीरज भैया देशमुख उपस्थित होते.