LSD विक्री करणारा पोलिसांनी घेतला ताब्यात ,एक लाखाचा मुद्देमाल ही सुद्धा जप्त
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने बेगमपुरा परिसरात कारवाई करून खादरी मारुफ अहमद शाहिद अहमद याला एलएसडी विक्री करताना अटक केली असून, त्याच्याकडून ०.०९ ग्रॅमचे दहा कागदी तुकडे असा तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की, जगभरात अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या ड्रग्जचा पुरवठा आता उच्चभ्रू पार्ट्या आणि तरुणाईपर्यंत पोहोचत असल्याने ही कारवाई करण्यात आली.