खटाव: जिहे-कठापूर योजनेवर सेवागिरी मंदिरात खुल्या चर्चेचे आव्हान : आ. शशिकांत शिंदे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल
Khatav, Satara | Nov 24, 2025 खटाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे श्रेय एकट्याने घेण्याचा काही लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हा केविलवाणा असून, या योजनेत योगदान देणाऱ्या सर्वांची पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंदिरात खुली चर्चा घ्यावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांचे नाव न घेता दिले. फडतरवाडी येथे सोमवारी सकाळी १० वाजता झालेल्या जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.