पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु.) शिवारात शनिवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता उसाच्या शेतात लागलेल्या भीषण आगीत तब्बल १५ एकरांहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले. या आगीत अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सिंचनासाठी अंथरलेली ठिबक पाईपलाइनही आगीत विरघळून खराब झाली आहे.