आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा येथे 192 कोटीचे ड्रग उत्पादन प्रकरणाचे धागेदोरे तपासण्यास सुरुवात केली असून संशयीताची कसून चौकशी केल्या जात आहे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांनी कारंजा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच अनेकांचे बयान नोंदवून घेतले या प्रकरणात डी आय आर च्या पथकाने पियुष मोटवानी आणि असीम शेख यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे मात्र या प्रकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे