अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महूसल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर १० ते १२ वाळूमाफियांनी स्प्रे मारून दुखापत केली तर एकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.