धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावाजवळील रेल्वे बोगद्याजवळून अवैधपणे मुरूमची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना धमकी देवून चालक वाहन घेवून पसार झाल्याची घटना मंगळवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.