धुळे: धनंजय मुंडेंविरोधात सकल मराठा समाज आक्रमक; शिवतीर्थ चौकात प्रतिमेला जोडे मारून निषेध
Dhule, Dhule | Nov 9, 2025 मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांनंतर धुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवतीर्थ चौकात सकल मराठा समाजाने आंदोलन करून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि “जर त्यांना साधा धक्का लागला तरी मराठा समाज पेटून उठेल” असा इशारा राज्य सरकारला दिला. आंदोलनात मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले.