यवतमाळ: शहरातील तलाव फैल येथे डोळ्यात मिर्चीपूड टाकून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचा प्रयत्न
यवतमाळ शहरातील तलाव फैल येथे घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मंगळसूत्र लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली आहे. बदल उर्फ गिरण्याकुमार मडावी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.