सेलू शहरात विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी लागली आहे. यशवंत चौकातील रस्त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम तब्बल वर्षभरापासून संथ गतीने रेंगाळत असून, धुळीने आणि खड्ड्यांनी नागरिकांचे हाल झाले आहेत. ठेकेदार नक्षत्र इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त नागरिक, व्यापारी व वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त करत १७ जानेवारी, शनिवारी दुपारी ३ वाजता आंदोलनाचा इशारा दिला.