डोरलेवाडी गावातील मुख्य रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घाबरलेल्या म्हैसीने अचानक धुमाकूळ घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत दोन ते तीन नागरिक जखमी झाले असून रस्त्यावर उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक देत म्हैसीने मोठे नुकसान केले.