येत्या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या घुग्गुस नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज घुग्गुस येथे काँग्रेस उमेदवार तसेच प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत उमेदवारांचा प्रभागनिहाय आढावा घेत कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना मार्गदर्शन केले. जनतेचा आपल्यावर विश्वास असून “लोकांचा हात हातात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे" धोरण आखा, तसेच पक्षाची रणनीती, प्रचार योजनेवरील चर्चा, उमेदवारांच्या कामाची परीक्षा आणि आगामी मतदानात्मक आव्हानांविषयी सल्ला दिला.