माहूर: तालुक्यातील मौजे सावरखेड येथे भरदिवसा आपले ताब्यात लोखंडी चाकू बाळगणा-या आरोपीवर सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Mahoor, Nanded | Nov 12, 2025 माहुर तालुक्यातील मौजे सावरखेड येथे दि 11 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एकच्या सुमारास यातील आरोपी अंकुश राठोड वय 35 वर्षे हा विनापरवाना बेकायदेशिररीत्या एक लोखंडी चाकू आपले ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला.याप्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल चौहाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी सिंदखेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चौहाण हे आज करीत आहेत.