धुळे शहरात रात्रीच्या शांततेचा भंग करत, कर्णकर्कश आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नागरिकांकडून वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलीस प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेच्या पथकाने ही विशेष मोहीम राबवली.