गोंदिया: शासकीय धान खरेदी केंद्रावर आता शेतकऱ्यांना लावावा लागणार अंगठा 30 नोव्हेंबर पर्यंत करता येणार नोंदणी
शासकीय धान खरेदी प्रक्रियेतील अनियमित्ता दूर करण्यासाठी शासनाने यावर्षीपासून धान विक्रीसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांचा थंब मशीनवर अंगठा घेण्याचे निर्देश दिले आहे यासाठी धान खरेदी केंद्रांना थंब मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली याची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे त्यामुळे आता शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांना थंब मशीनवर अंगठा लावावा लागणार आहे