दिवसेंदिवक मानवी वस्तीत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशातच आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास भाईंदर येथील बी पी रोड येथील एका मानवी वस्तीत बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याठिकाणी भेट दिली आहे.