यवतमाळ: ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासनाच्या विविध योजना ; पालकमंत्री संजय राठोड
पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करून पूरक व्यवसायांद्वारे शेतकरी, पशुपालक, मच्छिमार बांधवांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक योजना राज्य शासनाने हाती घेतल्या आहेत. त्यानुसार शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.