दुधना नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन; शासकीय कर्मचाऱ्यांचा थरारक पाठलाग आंबड तालुक्यातील चांभारवाडी परिसरात दुधना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामविकास अधिकारी स्वप्निल खरात यांना मिळाली होती. सदर माहिती त्यांनी तात्काळ आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना कळवली. तहसीलदारांच्या सूचनेनुसार महसूल विभागाच्या पथकाने कारवाई सुरू केली. महसूल विभागाचे शासकीय कर्मचारी स्वप्निल भिशी, विकास डोळसे व गोपाळ गाडेकर हे दोन खाजगी मोटारसायकलवरून वेग