अमळनेर: जळगाव पोलीस दलाचे मान उंचावले! पोलीस हवालदार नईम शाह यांचे 'बँड मेजर' कोर्समध्ये महाराष्ट्रातून प्रथम येऊन कौतुकास्पद यश
जळगाव पोलीस दलातील पोलीस मुख्यालय बँड पथकामध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार नईम शाह सलीम शाह यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जळगाव पोलीस दलाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले आहे.त्यांचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता अभिनंदन केले आहे.