यवतमाळ: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ ; जिल्ह्यात गावोगाव ग्रामसभांद्वारे जनजागृती
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्य स्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. यवतमाळ जिल्ह्यातही विविध ग्रामपंचायतींत ग्रामसभांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे जिल्ह्यातील १ हजार २०१ गावांमध्ये ग्रामसभेमध्ये जनजागृती करण्यात आली.