बुटीबोरी शहरात चोराची दहशत असून या चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी केली आहे पहिली घटना शिक्षक कॉलनी येथे घडली शिक्षक कॉलनी येथे राहणारे शमीन शेख हे आपल्या मुलांसह बाजारगाव शिवाय येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात घुसून वीस ते पंचवीस हजार रुपये नगदी व 100 ग्राम वजनाचे चांदीचे चाळ चोरून नेले तसेच वीर सावरकर कॉलनी येथील रुचिका उडान यांच्या घरात अज्ञात आरोपीने नगदी सोन्या चांदीचे दागिने असा 70 हजार रुपयांचा माल चोरून नेला.