पोखरण रोड क्रमांक 2 येथील बेथनी रुग्णालयाजवळ एका गृहसंकुलाजवळ काल बिबट्या आढळून आला. त्याचे मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वन विभाग, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता, बिबट्या आढळून आला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृती देखील केली. तसेच या संदर्भात आज दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.