सार्वजनिक रस्त्यावर तीनचाकी ऑटो धोकादायक पद्धतीने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटो चालकावर रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना तीन डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान कुडवा येथील शालिमार हॉटेल समोर घडली. आरोपी हा एमएच 35 एएच 0416 क्रमांकाच्या तीनचाकी आटो सार्वजनिक जागेवर रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत उभा करून ठेवत होता.