सौदड पुनर्वसन येथे दुचाकी गाडीला पडलेल्या क्रॅशच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर 'कटर'ने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी मयुर भारत मेश्राम (वय २६, रा. सौदड पुनर्वसन) याने आरोपी विशाल अनिल भुत्ते (वय २३, रा. सौदड पुनर्वसन) याची दुचाकी वापरण्यासाठी घेतली होती, जी परत करताना त्यावर क्रॅश असल्याचे आरोपीच्या लक्षात आले.