भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी घेतला रोहित पवारांचा समाचार
भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवारांनी शरद पवारांना 'देवाभाऊ' म्हणत ते लोकनेते नसून 'नटवरलाल' असल्याचा आरोप केला. कुलकर्णी यांनी म्हटले की, शरद पवारांनी ४० वर्षे राजकारण केले, पण ५५ आमदारांच्या पुढे ते कधीच जाऊ शकले नाहीत. जर त्यांनी कृषीमंत्री आणि चार वेळा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष दिले असते, तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती, असेही कुलकर्णी यांनी म्हटले.