हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार नाही, या मार्गाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. २०) पाहणी केली. याप्रंसंगी मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्री अनिल गेडाम, उपअभियंता श्री राजीव गौतम उपस्थित होते.