आज दिनांक 13 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आज प्रभाग क्र. १५ मध्ये संस्थान गणपती मंदिर येथे गणपती पूजनाने प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही प्रचार रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात पार पडत समारोप करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.