पेण तालुक्यातील हेटवणे वाडी येथील ४ वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. काल बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय ४ वर्षे ही आपली आई सोबत गावाबाहेर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली. फक्त ५ मिनिटांच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली.