नंदुरबार शहरातील छत्रपती हॉस्पिटल शेजारी मोकळ्या जागेतुन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पळून नेले आहे याबाबत दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी मुलीच्या वडिलांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास पोलिस करीत आहे.