विक्रमगड: वसई विरार महानगरपालिका आयुक्तांची पुनर्विकास धोरणासंदर्भात आमदार राजन नाईक यांनी महापालिका मुख्यालयात घेतली भेट
राज्य सरकारच्या इमारत पुनर्विकास धोरणा नुसार सदनिका धारकाला 15 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त अतिरिक्त एफएसआय बंधनकारक आहे. या संदर्भात आमदार राजन नाईक यांनी वसई विरार महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची मुख्यालयात भेट घेतली. प्रकल्प आराखड्यात सदनिकेच्या नोंदणीसह सदनिका धारकाला अतिरिक्त पंधरा स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त एफएसआय मिळाला का याची खात्री करून प्रकल्प मंजुरी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आमदारांनी केली.