समुद्रपूर: गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर पोलीसाची गावठी मोहा दारू विरोधात मोठी कारवाई:१० लाख८२ हजार८०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट
समुद्रपूर आगामी काळातील निवडणूकीच्या अनुषंगाने समुद्रपूर पोलीसांनी गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहिम राबविण्यात १० लाख ८२ हजार ८०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला.पोलिसांना गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारूचे गाळपाण होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ठाणेदार रविद्र रेवतकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन पाहणी केली असता याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडा झुडपात जमीन गाडून मोहा सडवा व गावठी मोहा दारू आढळून आला.