गोंडपिंपरी: दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
धाबा गावाजवळील बोरकर यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर दोन दुचाकींची भीषण टक्कर झाली. या अपघातात सकमूर येथील नानाजी मनिराम कोरडे (४५) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ५) दुपारी घडली. नानाजी कोरडे हे सकमूर येथून धाबा गावाकडे दुचाकीने जात असताना, वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसली. दुसऱ्या दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.