रत्नागिरी: समुद्रकिनारी वाहन चालवताना आढळल्यास होणार कठोर कारवाई : रत्नागिरी जिल्हा पोलीस
बाहेरून येणाऱ्या अति उत्साही पर्यटकांकडून समुद्रकिनारी वाहन चालवण्याचे आणि स्टंट करण्याचे प्रकार वारंवार घडत असून यातून अनेकदा दुर्घटना घडत आहेत. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलीस दलांकडून जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.