आज बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी निलफार्म, कळमेश्वर येथे सावनेर, कळमेश्वर, खापा व मोहपा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी डॉ. आशिष देशमुख आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. मनोहरजी कुंभारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.