कारंजा: बँकेच्या कर्जापोटी शेतकऱ्यांनी केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या खैरवाडा शिवारातील घटना...
Karanja, Wardha | Oct 31, 2025 नापिकी आणि शेतीवर असलेल्या कर्जामुळे शेतकरी हतबल झाला त्यातच अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले त्यामुळे सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मौजा खैरवडा शिवारातील घडली .30 तारखेला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी केली आहे.. उमेश ओमप्रकाश घसाळ वय छत्तीस वर्षे राहणार दानापूर तालुका कारंजा असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.. या घटनेचा तपास सुरू असल्याचे आज पोलिसांनी स्पष्ट केले