लातूर: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत २४ बालकांवर होणार हृद्यरोग विषयक उपचार,जिल्हाधिकारी, मुख्यअधिकारी यांचा संवाद
लातूर-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शासकीय, निमशासकीय शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हृद्यदोष आधालेल्या २४ बालकांवर पुणे येथील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून यासाठी ही बालके रवाना झाली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या पालकांशी साधला.